जळगावातील विवाहितेचा तिसर्या मजल्यावरून पडताच मृत्यू
A married woman in Jalgaon died after falling from the third floor जळगाव : तिसर्या मजल्यावरून पडल्याने जळगाव शहरातील पिंप्राळा परीसरातील श्रीरत्न कॉलनीतील 33 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला. मनीषा शामकांत बाविस्कर (30, रा.श्रीरत्न कॉलनी, पिंप्राळा परिसर, जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
तोल जावून पडल्याने मृत्यू
पिंप्राळा परिसरातील श्रीरत्न कॉलनी परीसरात मनीषा बाविस्कर ही विवाहिता पती, दोन मुले, सासू, सासरे यांच्यासह श्रीरत्न कॉलनीत वास्तव्याला होती. एस.टी.वर्कशॉप येथे त्या काम करीत होत्या तर पती शामकांत हे सैन्यदलात जवान असून त्रीपुरा येथे देशसेवा करतात. दरम्यान, शनिवार, 24 फेब्रुवारी रोजी राहत्या घरी काम करीत असताना सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास तिसर्या मजल्यावरून त्या खाली पडून गंभीर जखमी झाल्या.


कुटुंबीयांनी व नागरिकांनी त्यांना तात्काळ खाजगी रुग्णाल्यात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना दुपारी 12.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.