दुचाकीला कट लागल्याचा जाब विचारताच जळगावात महिलेवर चॉपरने हल्ला


A woman was attacked with a chopper in Jalgaon as soon as she asked for an account of being cut on a two-wheeler जळगाव : दुचाकीचा कट लागल्याचा जाब विचारल्यानंतर संशयितांनी आशाबाई प्रभाकर पाटील (रा. बालाजी पेठ) यांच्यासह त्यांच्या मुलावर चॉपरने हल्ला केला. हा प्रकार रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शेजारील गल्लीत घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

जाब विचारताच केला हल्ला
बालाजी पेठ भागातील आशाबाई पाटील या रविवार, 25 फेब्रुवारी त्यांचा मुलगा गणेश सोबत एरंडोल येथे गेल्यानंतर सायंकाळी गावात परतल्या. भजे गल्लीतून घरी जात असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शेजारील गल्लीत दुचाकीवर जाणार्‍या (क्र.एम.एच.19 सी.ई.9669) मद्यपी तरुणांनी कट मारताच आशाबाई व मुलाने दुचाकीस्वारांना जाब विचारल्याने संबंधितांना राग आला व संशयित तरुण महिलेच्या दिशेने आले व त्यांनी महिलेसह त्यांच्या मुलाला शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली.



आशाबाई यांनी त्याला प्रतिकार केला असता मद्यपी तरुणाने त्याच्या कंबरेला खोचलेला चॉपर काढून महिलेवर वार केला. मद्यपी तरुण गणेश याच्यावरही चॉपरने वार करत असताना आशाबाई मध्ये आल्या व त्यांनी तो वार हातावर झेलला. त्या वेळी झटापट झाल्याने मद्यपी तरुणाचा शर्टही फाटला. या घटनेत महिला व मुलाला दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलिससात तक्रार दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !