ट्रॅक्टर चोरटा अवघ्या 24 तासात चाळीसगाव शहर पोलिसांच्या जाळ्यात
Tractor thief in Chalisgaon city police net in just 24 hours चाळीसगाव : मध्यप्रदेशातील ट्रॅक्टर चोरट्याला चाळीसगाव शहर पोलिसांनी अवघ्या 24 तासात पकडले असून त्यास अटक करण्यात आली. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला शुक्रवार, 23 फेब्रुवारी रोजी ट्रॅक्टर चोरीची फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवत संशयित आरोपी प्रेमसिंग देवराम पावरा (रा. मध्यप्रदेश) याला अटक केली तर त्याच्या ताब्यातून चोरलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात आले.
24 तासात संशयित निष्पन्न
ट्रॅक्टर मालक गणेश गोविंदराव झेंडे (35) यांनी फिर्याद दिल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आाल. पोलिसांनी गोपनीय व तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयित निष्पन्न करीत त्यास अटक केली.


यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, सहा.पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात हवालदार प्रशांत पाटील, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे आदींच्या पथकाने केली.