दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित जळगाव एलसीबीच्या जाळ्यात : भुसावळातून आवळल्या मुसक्या


Suspects in two-wheeler theft crime in Jalgaon LCB’s net : Smiles from Bhusaval जामनेर : जामनेर पोलिसांना दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात हव्या असलेल्या संशयिताला जळगाव गुन्हे शाखेने भुसावळातून रविवारी अटक केली. फरदीन उर्फ साहील गोल्डन जमीलोद्दीन शेख (21, गणेशवाडी, जामनेर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. त्यास जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, पोलीस उपअधीक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, हवालदार किशोर राठोड, नाईक रणजीत जाधव, कॉन्स्टेबल श्रीकृष्ण देशमुख, कॉन्स्टेबल सचिन महाजन आदींच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !