धामणगावच्या दुचाकीस्वाराचा भीषण अपघातात मृत्यू


A bike rider of Dhamangaon died in a horrific accident जळगाव  : भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला जबर धडक दिल्याने धामणगावातील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा भीषण अपघात ममुराबाद ते विदगाव रस्त्यावरील फार्मसी महाविद्यालयाजवळ मंगळवार, 27 फेब्रुवारी रोजी रात्री 11.15 वाजेच्या सुमारास घडला. जळगाव तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करत मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवला. उमाकांत गणेश सपकाळे (22, रा.धामणगाव, ता.जळगाव) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

जागीच ओढवला मृत्यू
जळगाव तालुक्यातील धामणगाव येथील रहिवासी उमाकांत सपकाळे हा तरुण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. मंगळवार, 27 फेब्रुवारी रोजी उमाकांत सपकाळे हा तरुण रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास धामणगाव येथून दुचाकी (एम.एच.19 डी.ई.6377) ने धामणगावकडून जळगावकडे येत असताना ममुराबाद ते विदगाव रस्त्यावरील फार्मसी महाविद्यालयाजवळ भरधाव वेगाने येणारा डंपर (क्रमांक एम.एच.14 जी.सी.2423) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीसह दुचाकीस्वार रस्त्याच्याकडेला फेकले गेले व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उमाकांत सपकाळे यांचा जागीच मृत्यू झाला तर भरधाव डंपर देखील उलटले.



अपघातानंतर डंपरचालक हा घटनास्थळाहून पसार झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलिसांनी घटनस्थळी धाव घेवून पंचनामा केला व मयताची ओळख पटविली. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !