भांडण सोडविण्याचा प्रयत्न केल्याच्या रागातून डोक्यात मारली फरशी


Hit the floor on the head out of anger for trying to resolve the conflict जळगाव : दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन वाद झाला. हा वाद मिटविण्यासाठी आलेल्या एकाच्या डोक्यात फरशीचा तुकडा टाकून त्यांना जखमी करण्यात आले. ही घटना रविवार, 25 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडली.

कट मारल्याच्या रागातून घटना
जितेंद्र शंकरसिंग राजपूत (वय 35 रा. रामेश्वर कॉलनी मेहरुण) हे त्यांच्या मुलासोबत दुचाकीने जात असताना संशयितांनी दुचाकीचा कट मारला होता. यात जितेंद्र यांच्या शालकाला दुखापत झाली. शालकावर उपचार करण्यासाठी जितेंद्र हे रुग्णालयात आले होते. याठिकाणी संशयितांनी शालकाशी भांडणाला सुरुवात केली. हे भांडण सोडविण्यास जितेंद्र हे गेले असता गोपाल रामचंद्र माळी याने हातातील फरशीच्या तुकडा डोक्यात मारुन दुखापत केली. शालकाला मारहाण करुन तिघे पळून गेले.



याप्रकरणी अजय रवींद्र कोळी, गोपाल माळी, रितेश संजु गोंळधी, पंकज जसपाल चौधरी (सर्व रा.रामेश्वर कॉलनी) यांच्याविरुध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश भावसार करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !