निष्कलंक धाम वढोदा येथे संत संमेलन उत्साहात

सकारात्मक समाज प्रबोधनासाठी संत संमेलनाचे आयोजन


फैजपूर : अयोध्येत निर्माण झालेल्या श्रीराम मंदिरामुळे देशभरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आता यापुढे समाजात धर्म जागरण संस्था देवगिरी प्रांत यांनी पुढाकार घेऊन भविष्यात संत, महंत, कथाकार, कीर्तनकार, पूजारी, प्रवचनकार, भगत यांच्यामार्फत कुटुंब प्रबोधनासाठी श्री निष्कलंकधाम वढोदा येथे संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनात मराठवाडा व खानदेश मिळून 16 जिल्ह्यांमधून जवळपास 250 संत महंत प्रवचनकार कथाकार आदींची उपस्थिती लाभल्याचे महामंडलेश्वर जनार्दन महाराज म्हणाले.

संत महात्मे प्रबोधन करणार
समाज घातक सर्व बाबींवर उपाययोजना करण्यावर चर्चासत्रांमध्ये भर राहिला तसेच संत संमेलनात झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने उपस्थित सर्व संत महात्मे यापुढे समाजात प्रबोधन करणार असल्याची माहिती अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, धर्म जागरण संस्थेचे योगी दत्तानाथजी, श्री गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे गादीपती श्री श्याम चैतन्यजी महाराज यांनी पत्रकार परीषदेत सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !