विवरेत शौचालयाची निविदा निघण्यापूर्वी केले निकृष्ट काम
ग्रामपंचायत सदस्याची चौकशीसाठी गटविकास अधिकार्यांकडे तक्रार
खिर्डी : रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातील कामांची चौकशी करावी तसेच संबधित ठेकेदाराच्या काामंची गटविकास अधिकार्यांनी चौकशी करावी, अशी मागणी सदस्यांनी गटविकास अधिकार्यांकडे केली आहे.
निविदेपूर्वीच शौचालयाचे निकृष्ट काम
2022-2023 तसेच 2023-2024 या पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत मंजूर आराखडयातील झालेल्या निकृष्ट दर्जाचे काम हे अंत्यत भेसळीयुक्त दर्जाचे दिसून येते. गावातील ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक एक ते पाच या वॉर्डातील करण्यात आलेल्या व करण्यात येत असलेली कामे ही अत्यंत खालच्या स्तरावर व निकृष्ठ दर्जाची आहेत. विशेष म्हणजे शौचालयाच्या कामाची निविदा काढण्याआधीच संबंधितांकडून या शौचालयाचे अर्धवट काम हे मार्गस्थ करण्यात आल्याा आरोप असून संबंधित विभाग तसेच संबंधित ठेकेदारवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. गावात सध्या सुरू असलेल्या कामांना त्वरीत थांबण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य युसूफ खाटीक यांनी रावेरचे गटविकास अधिकारी रावेर यांच्याकडे केलेल्या तक्रार अर्जान्वये केली आहे.


