जळगावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार : भुसावळातील तरुणाला अटक


Abuse of a minor girl in Jalgaon : Youth from Bhusawal arrested जळगाव : शहरातील एका शाळेच्या प्रवेशद्वारावरून 14 वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीला एका रूमवर नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून याकप्रकरणी संशयित तरुणाविरोधात शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयित तरुणाला अटक केली आहे. हर्षल दीपक सोनवणे (21, भुसावळ) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

मित्राच्या रुमवर नेत अत्याचार
14 वर्ष व दहा महिने वयाच्या पिडीतेला आरोपी हर्षल दीपक सोनवणे (21, भुसावळ) या संशयिताने 1 जानेवारी 2024 रोजी शहरातील एका शाळेच्या प्रवेशद्वारापासून दुचाकीवरून मित्राच्या रूमवर नेले व तिचे तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसांत पोस्कोच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित तरुणाला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास शनीपेठ पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !