आजच्या माहिती तंत्रज्ञान युगात भाषा टिकली पाहिजे : डॉ.सिंधू भंगाळे


Language should survive in today’s information technology era : Dr. Sindhu Bhangale भुसावळ : मराठी भाषेची समृद्धी ही प्राचीन काळापासून चालत आलेली असून ती आजतागायत कायम आहे. मराठीने अनेक स्थित्यंतर बघितली. प्राचीन शिलालेख, ताम्रपट, प्राचीन ग्रंथ तसेच विविध राजवटीमध्ये मराठी भाषा ही महाराष्ट्रातील लोकांच्या जीवनाची प्रमुख भाषा होती. आपण मराठी भाषिक लोकांनी आजच्या युगामध्ये मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करून ती जगवली पाहिजे, टिकवली पाहिजे, असे मत धनाजी नाना महाविद्यालयातील माजी मराठी विभाग प्रमुख डॉ.सिंधू भंगाळे यांनी येथे व्यक्त केले. कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ येथील मराठी विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिन तसेच कवी कुसुमाग्रज जन्मदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ.भंगाळे म्हणाल्या.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील होते. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रोफेसर डॉ.बी.एच.बर्‍हाटे, मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.जे.एफ.पाटील प्रा.डॉ.के.के.अहिरे, डॉ.पुरुषोत्तम महाजन उपस्थित होते. प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. डॉ.जे.एफ.पाटील यांनी केले. विविध स्पर्धेतील पारीतोषिक मिळालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. त्यात प्रामुख्याने मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त देवेंद्र जुलाल धनगर, द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी अश्विनी विनोद इंगळे, तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी रूतिक राजेश इंगळे या विद्यार्थ्यांना पारीतोषिक देण्यात आले. मराठी व्याकरण प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमांमध्ये काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांचा परीचय प्रा.वंदना महाजन यांनी दिल. सूत्रसंचालन डॉ.पुरुषोत्तम महाजन तर आभार डॉ.दिनानाथ पाठक यांनी मानले. प्रा.डॉ.स्मिता चौधरी, डॉ.एस.टी.धूम, डॉ.प्रफुल्ल इंगोले, प्रा.गौतम भालेराव, डॉ.मनोज पाटील, डॉ.राजाराम तायडे, प्रा.सुनील अडकमोल प्रा.डॉ.स्वाती महाजन, प्रा.शीतल सोनवणे, प्रा.शलाका निकम, प्रा.अक्षरा साबळे इत्यादी प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होत्या.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !