भुसावळ-मुंबई विशेष गाडीच्या कालावधीत वाढ
भुसावळ : उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांना वाढलेली प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने भुसावळ-मुंबई सेंट्रल विशेष गाडीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 09052 भुसावळ-मुंबई सेंट्रल गाडीला आता 1 मे पर्यंत गाडी क्रमांक 09051 मुंबई सेंट्रल-भुसावळ गाडीला 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गाडीच्या वेळ, थांबा आणि रचना यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.


