जळगावात जुन्या वादातून तरुणावर गोळीबार : चौघांविरोधात गुन्हा


Jalgaon shooting at youth due to old dispute : Crime against four जळगाव : जळगाव शहरातील श्रीराम कन्या शाळेजवळ 18 वर्षीय तरुणावर जुन्या वादातून गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार, 1 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी चौघांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

घरगुती वादातून गोळीबार
सोहम गोपाल ठाकरे (18, मेहरुण, जळगाव) या तरुणाने एमआयडीसी पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवार, 1 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील श्रीराम कन्या शाळेनजीक जुन्या वादातून एका संशयिताने पिस्तूलातून एक गोळी झाडली मात्र पळ काढल्याने तरुण बचावला. याप्रकरणी चौघा संशयितांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.



पोलीस अधिकार्‍यांची धाव
शहरात भरदिवसा झालेल्या गोळीबारानंतर अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील, एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक निरीक्षक दयानंद सरवदे यांच्यासह एमआयडीसी पोलिसांनी धाव घेतली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !