जळगावातील 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार : व्हिडिओ व्हायरलची धमकी


Abuse of 20-year-old girl in Jalgaon : Threat of video going viral जळगाव : जळगाव शहरातील एका भागातील 20 वर्षीय तरुणीशी ओळख निर्माण करीत सलगी वाढवल्यानंतर तिला जळगाव-भुसावळ रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये नेत तिच्यावर बळजबरीने अत्याचार करण्यात आला शिवाय संबंधाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी तरुणीने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यानंतर भूषण निलेश पाटील (रा.खेडी, ता. जळगाव) यास अटक करण्यात आली.

व्हिडिओ व्हायरलची धमकी
जळगाव शहरातील एका भागात 20 वर्षीय तरुणी वास्तव्यास असून तिची भूषण पाटील याच्यासोबत ओळख निर्माण झाली. भूषणने तरुणीशी जवळीक साधून तिच्यावर शहरातील हॉटेलमध्ये घेवून जात तिच्यावर अत्याचार केला तसेच अत्याचाराचा व्हिडिओ तयार करीत तो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून तीन ते चार लाखांचे दागिणे घेतले व कोर्‍या कागदावर स्वाक्षरी करण्यास सांगितले परंतु तरुणीने स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने भूषण पाटील याने मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार 14 फेब्रुवारी व 28 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी दोन वाजता घडला.



अत्याचारप्रकरणी तरुणीने एमआयडीसी पोलीसात तक्रार दिल्यानंतर भूषण निलेश पाटील याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणाला पोलिसांनी अटक केली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे हे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !