जळगाव तालुक्यातील दुचाकी चोरटे जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
अमळनेर हद्दीतून चोरी केलेल्या तीन दुचाकी जप्त : आरोपी अमळनेर पोलिसांच्या ताब्यात
Two-wheeler thieves in Jalgaon taluka in the net of Jalgaon crime branch
जळगाव : अट्टल दुचाकी चोरट्यांना जळगाव गुन्हे शाखेने अटक केली असून आरोपींच्या ताब्यातून अमळनेर पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केलेल्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या दुचाकींबाबत अमळनेर पोलिसात गुन्हे दाखल आहेत. आकाश गोरखनाथ सोनवणे (23, रिधूर) व मयूर भगवान कोळी (21, रिधूर, ता.जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.



गोपनीय माहितीवरून कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील , हवालदार जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, अकरम शेख, महेश महाजन, बबन पाटील, हेमंत पाटील, भारत पाटील, महेश सोमवंशी आदींनी ही कारवाई केली. या कारवाईकामी जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे अमंलदार रामकृष्ण इंगळे व अभिषेक पाटील यांनी सहकार्य केले. दुचाकी चोरट्यांना अमळनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.