किल्ला पाहण्यासाठी आलेल्या सिल्लोडच्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला


Bees attack Sillod tourists visiting the fort सोयगांव : वेताळवाडी किल्ला पाहण्यासाठी आलेल्या सिल्लोड येथील पर्यटकांवर मधमाशानी हल्ला केला. ही घटना रविवार, 3 रोजी सायंकाळी सहा ते साडे सहा वाजता घडली. तिघांवर सोयगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी सिल्लोड हलविण्यात आले. एकाच्या चेहर्‍यावर मधमाशा चावल्याने गंभीर आहे.

एका पर्यटकाची प्रकृती गंभीर
सिल्लोड येथील प्रभाकर लक्ष्मण नागणे (26), रमण नंदकिशोर आरके (25), व योगेश शंकर इंगळे (24) व अन्य दोघे रविवारची सुट्टी असल्यामुळे वेताळवाडी किल्ला पाहण्यासाठी आले होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास वेताळवाडी किल्ला पाहत असतांना मधमाशांवर कुणीतरी दगड मारल्याने खवळलेल्या मधमांशांनी पर्यटकांवर हल्ला केला. आगे माशा असल्यामुळे वेदना असह्य झाल्याने पर्यटकांना पाच वाजता सोयगांव ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ.खंदारे यांनी त्यांच्यावर उपचार केले. यातील रमण आरके याला चेहर्‍यावर मधमाशा चावल्यामुळे चेहरा सुजलेल्याने त्यांना अधिक उपचारासाठी तत्काळ सिल्लोडला हलविण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !