अडीच हजारांची लाच भोवली : नाशिकमधील लासखोर एएसआय एसीबीच्या जाळ्यात
Bribe of 2.5 thousand: ASI in Nashik caught in ACB’s net नाशिक : कुंटणखाना चालवत असल्याची धमकी देत हॉटेल व्यावसायीकांकडून अडीच हजारांची लाच उकळणार्या नाशिक शहर पोलीस दलातील विशेष शाखेतील एएसआय शंकर जनार्दन गोसावी (रा.फ्लॅट नंबर 108, ठक्कर हार्मनी, ए विंग, शहनाई लॉन्स जवळ टाकळी रोड, तपोवन, नाशिक) यांना नाशिक एसीबीने बुधवारी सायंकाळी उशिरा लाच स्वीकारताच अटक केली.
असे आहे लाच प्रकरण
30 वर्षीय तक्रारदार हे नाशिक शहर पोलीस आयुक्तालायचे हद्दीत एक कॅफे चालवतात. हा कॅफे कॉलेज परिसरात असल्याकारणाने तेथे विद्यार्थी – विद्यार्थीनीं यांची वर्दळ असते. त्यामुळे विद्यार्थि यांना बसण्यासाठी आडोसा करण्यात आल्यानंतर आरोपी एएसआय शंकर गोसावी यांनी सहा महिन्यांपूर्वी तक्रारदाराला तू कुंटणखाना चालवितोस तुझ्यावर कारवाई करेन असा दम देऊन तक्रारदार यांच्या कॅफे वर कारवाई न करण्याचे मोबदल्यात त्यांच्याकडून दरमहा दोन ते तीन हजार रुपये महिना लाच सुरू केली होती.


तक्रारदार हे फक्त रेस्टॉरंट व्यवसाय करत असून कोणताही गैरव्यवसाय करत नाहीत. म्हणून त्यांना आरोपी लोकसेवक यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग येथे तक्रार केली व लाच पडताळणीत तक्रारीत तथ्य आढळले. बुधवारी सायंकाळी अडीच हजारांची लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप बबन घुगे, पोलीस नाईक गणेश निंबाळकर, पोलीस शिपाई नितीन नेटारे आदींनी हा सापळा यशस्वी केला.