प्रदीप ठाकूर यावलचे तर विशाल जयस्वाल रावेरचे नूतन पोलीस निरीक्षक : जिल्हा पोलीस दलातील अधिकार्‍यांच्या बदल्या


Pradeep Thakur Yaval and Vishal Jaiswal Raver New Police Inspectors :  Transfers of Officers in District Police Force भुसावळ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी पुन्हा जळगाव जिल्हा पोलीस दलातील अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नूतन पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी बुधवार, 6 मार्च रोजी सायंकाळी या संदर्भात बदल्या केल्या आहेत. सात पोलीस निरीक्षक,दोन सहाय्यक निरीक्षक व सात उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात नव्यानेच दाखल झालेल्या अधिकार्‍यांनाही पोलीस ठाणे मिळाले आहे. यावल पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून प्रदीप ठाकूर तर रावेरला विशाल जयस्वाल यांची प्रभारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

पोलीस ठाणे मिळालेले निरीक्षक असे
जळगाव जिल्हा पेठचे डॉ.विशाल जयस्वाल यांची रावेर पोलीस ठाणे प्रभारीपदी



नियंत्रण कक्षातील राकेश मानगावकर यांची जिल्हा पेठ पोलीस ठाणे प्रभारीपदी

अमरावती ग्रामीणहून जिल्ह्यात आलेले व हल्ली रावेरात नियुक्त प्रदीप खंडू ठाकूर यांची यावल प्रभारी

नाशिक ग्रामीण येथून आलेले राजेंद्र कुटे यांची रामानंद नगर पोलीस स्टेशन प्रभारी

नाशिक ग्रामीण येथून पांडुरंग पवार यांना भडगाव पोलीस ठाणे प्रभारीपदी

मुंबई लोहमार्ग येथून आलेले दत्तात्रय निकम यांच्याकडे सायबर पोलीस ठाणे व आर्थिक गुन्हे शाखा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली.

दोघा सहाय्यक निरीक्षकांना मिळाले पोलीस ठाणे
अहमदनगर येथून आलेले प्रशांत खंडारे यांना चोपडा शहर तर महेश मोहनराव येसेकर यांना पारोळा पोलीस स्टेशन मिळाले आहे.

सात उपनिरीक्षकांना मिळाली नियुक्ती
नाशिक ग्रामीण येथून आलेल्या विजय गायकवाड (भुसावळ शहर पोलीस स्टेशन), बबन पाटोळे (फैजपूर पोलीस स्टेशन), चंद्रकांत दवंगे (जामनेर पोलीस स्टेशन), संजय विधाते (पहूर पोलीस स्टेशन), धुळे येथून आलेले कैलास दामोदर यांना रामानंद नगर पोलीस स्टेशन, अहमदनगर येथून आलेले भरत हरिभाऊ दाते यांना पहूर पोलीस स्टेशन, नंदुरबार येथून आलेल्या प्रिया प्रसाद वसावे यांना रावेर पोलीस ठाण्यात नियुक्ती मिळाली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !