भुसावळात आज प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान


भुसावळ : शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिवसानिमित्त रविवार, 10 रोजी ‘नारी तू नारायणी: सन्मान स्वित्वाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दुपारी 3.30 वाजता संतोषी माता हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल. त्यात विविध विषयांवर नाटिका, नृत्य सादर होईल शिवाय शहरातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात येईल, मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी कळवले आहे,




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !