आदिशक्ती संत मुक्ताई माघवारी महाशिवरात्री यात्रोत्सवाची उद्या प्रक्षाळ पूजेने सांगता


Adishakti Saint Muktai Maghwari will celebrate Mahashivratri pilgrimage tomorrow with Prakshaal Puja मुक्ताईनगर : आदिशक्ती संत मुक्ताई माघवारी महाशिवरात्री यात्रोत्सवाची सांगता मंगळवारी सकाळी प्रक्षाळ पूजेने होणार आहे.

लाखो भाविक मुक्ताई चरणी नतमस्तक
यंदाचा माघवारी महाशिवरात्र यात्रोत्सव संत मुक्ताबाई अंतर्धान समाधीस्थळ मुळमंदिर कोथळी मुक्ताईनगर येथे माघ शु.8 पासुन सुरुवात झाला. तेव्हापासून आजपर्यंत आई मुक्ताईचे दर्शन शेकडो दिंड्या पालख्यासह सुमारे सहा लाखांवर भाविकांनी घेतले. यात्राकाळात मंदिर 24 तास खुले ठेवण्यात आले.



आईसाहेबांचे नित्य उपचार बंद असतात. मंदिर परिसराची स्वच्छता करणे व देवतेचा शिणभाग घालविण्यासाठी विविध औषधी काढे देणे असे प्रक्षाळ पूजेचे दोन भाग असतात. यावेळी मूर्तीस लिंबू साखर उपस्थित भाविकांकडून लावून घेतले जाते व महापूजा अभिषेक करण्यात येतो. दरम्यान, फाल्गुन शु.2 मंगळवार, 12 मार्च रोजी सकाळी सात वाजेपर्यंत मुळमंदिर येथे प्रक्षाळ पूजेस हजर राहावे, असे आवाहन श्रीसंत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !