चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी : परप्रांतीय गुन्हेगारांच्या चौकडीकडून नऊ गावठी कट्ट्यांसह 20 जिवंत काडतूस जप्त


Chopra Rural Police’s big achievement : 20 live cartridges along with nine village knives seized from a quartet of migrant criminals चोपडा : मध्यप्रदेशातील पारउमर्टी येथील संशयित गावठी पिस्टलांच्या विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचत पंजाबमधील खरेदीरासह शस्त्र विक्री करणार्‍या चौकडीच्या मुसक्या बांधल्या आहेत. संशयितांकडून 20 जिवंत काडतूस तसेच नऊ गावठी बनावटीचे पिस्टल (गावठी कट्टे) जप्त करण्यात आले. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी पत्रकार परीषदेत दिली. अटकेतील संशयितांमध्ये पारउमर्टीच्या दोघांसह जळगाव व पंजाब राज्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

या संशयितांना अटक
चोपडा ग्रामीण पोलिसांनी संशयित हरजनसिंग प्रकाशसिंग चावला (20, रा.पारउमर्टी, ता.वरला, जि.बडवाणी, म.प्र), मनमीतसिंग धृवासिंग बर्नाला (20, रा.पारउमर्टी, ता.वरला, जिल्हा बडवाणा, म.प्र), अलबास दाऊद पिंजारी (27, रा.महादेव चौक बाजार पेठ हरिविठ्ठल नगर, जळगाव), अर्जुन तिलकराज मलिक (25, रा.एकता नगर, चमरंग रोड अमृतसर, राज्य पंजाब) यांना अटक केली आहे. रविवार, 10 मार्च रोजी ही कारवाई कृष्णापूर, ता. चोपडा शिवारातील उमर्टी रोडवरील घाटात करण्यात आली.



आरोपींकडून पोलिसांना धक्काबुक्की
आरोपींनी कारवाईला विरोध करीत पोलीस पथकाला यावेळी धक्काबुक्की केली. आरोपींकडील दुचाकी (एम.एच.19 ई.एफ.3793 व एम.पी.69 एम.ए.1848) व चार मोबाईल हॅण्डसेट जप्त करण्यात आले. एकूण चार लाख सात हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हवालदार शशिकांत हिरालाल पारधी यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अलबास पिंजारी (27, रा.महादेव चौक बाजार पेट, हरिविठ्ठल नगर, जळगाव) हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर राज्यात सुमारे दहा गुन्हे दाखल आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, चाळीसगाव विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीण निरीक्षक कावेरी कमलाकर, हवालदार शशिकांत पारधी, हवालदार किरण पाटील, कॉन्स्टेबल गजानन पाटील, संदीप निळे, होमगार्ड थावर्‍या वारेला, होमगार्ड सुनील धनगर, होमगार्ड श्रावण तेली, होमगार्ड संदीप सोनवणे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !