पंतप्रधानांच्या हस्ते उद्या 506 प्रकल्पांचे उद्घाटन

दहा वंदे भारत गाड्यांना सुरूवात : भुसावळ विभागातील 32 प्रकल्पांचा समावेश


PM to inaugurate 506 projects tomorrow भुसावळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार, 12 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशभरातील अनेक ठिकाणी एकाच वेळी आयोजित समारंभांमध्ये 85 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन करीत आहेत शिवाय 10 वंदे भारत गाडयांना हिरवा झेंडा दाखवून सुरूवात करणार आहेत.

506 प्रकल्पांचे उद्या उद्घाटन
महाराष्ट्रात माननीय पंतप्रधानांच्या हस्ते एकूण 506 प्रकल्पांचे उद्घाटन/ राष्ट्राला समर्पित केले जाईल. यापैकी 32 प्रकल्प भुसावळ विभागांतर्गत येतात ज्यात 25 एक स्टेशन, एक उत्पाद स्टॉल, दोन माल गोदामे, बडनेरा वॅगन दुरुस्ती कार्यशाळा, मनमाड-जळगाव तिसरी लाईन, एक जन औषधी केंद्र आणि दोन रेल्वे कोच रेस्टॉरंटचा समावेश आहे. भुसावळ विभागात हा कार्यक्रम नाशिक, मनमाड, धुले, जळगाव, शेगाव, अकोला, बडनेरा, बर्‍हाणपूर आणि खंडवा येथे आयोजित करण्यात आला.


कॉपी करू नका.