जळगावात लोखंडी सुर्याच्या धाकावर दहशत : आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात
Panic in Jalgaon due to Iron Surya : Accused in the net of MIDC police जळगाव : खेडी बसस्थानकजवळ लोखंडी सुरा घेवून फिरणार्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. कमलेश प्रकाश सपकाळे (21, रा. हरीओम नगर, जळगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
लोखंडी सुर्याच्या धाकावर दहशत
जळगाव शहरापासून जवळ असलेल्या खेडी गावाच्या बसस्थानक परिसरात संशयित आरोपी कमलेश सपकाळे हा हातात लोखंडी सुरा घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस कर्मचार्यांनी सोमवार, 11 मार्च रोजी रात्री 9 वाजता कारवाई करत लोखंडी सुरा घेवून फिरणार्या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून लोखंडी सुरा हस्तगत केला आहे.


याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी कमलेश सपकाळे याच्या विरोधात रात्री 10 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक विकास सातदिवे हे करीत आहे.