भुसावळात संजय गांधीसह विविध प्रकरणाची दिल्लीच्या समितीकडून तपासणी


Investigation of various cases involving Sanjay Gandhi in Bhusawal by Delhi committee भुसावळ : भुसावळ तहसील कार्यालयातील शासनाच्या विविध योजनांचा आढावा केंद्र सरकारच्या दिल्ली येथील पथकाने मंगळवारी घेतला. येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना कार्यालयास भेट देऊन त्यांनी इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेची माहिती जाणून घेतली.

दिल्लीतील पथक भुसावळात
मंगळवारी सकाळी 10 वाजताच दिल्ली येथील पथक तहसील कार्यालयात येऊन दाखल झाले. संपूर्ण जिल्हाभरात हे पथक केद्रीया योजनांची माहिती घेत असून त्याच्या कामाचा आढावा घेत आहे. त्याच धर्तीवर भुसावळ तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना कार्यालयात जात त्यांनी इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेचा आढावा घेतला. यावेळी नायब तहसीलदार अंगद आसटकर यांनी त्यांना योजेनेच्या फाईल दिल्यात. त्यांची तपासणी झाली. अकाऊंटची तपासणी केली. कुर्‍हा पानाचे येथे जात तेथील लाभार्थीसोबत चर्चा केली, अशी माहिती नायब तहसीलदार आसटकर यांनी दिली. दिल्ली येथील पथकात दीप्ती, एस.आर.मीना, आर.एस. नागर यांचा समावेश होता. भुसावळ येथील तपासणी करून हे पथक यावल व रावेर येथे तपासणी करण्यासाठी रवाना झाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !