चाळीसगावात नऊ लाखांचा गुटखा जप्त : इको चालकाला अटक


Gutkha worth nine lakhs seized in Chalisgaon : Echo driver arrested चाळीसगाव :चाळीसगाव शहरात नाकाबंदीदरम्यान इको वाहनातून शहर पोलिसांनी नऊ लाखांचा गुटखा जप्त केला आहे. बुधवारी रात्री 12.15 वाजता तिरंगा पुलावर ही कारवाई करण्यात आली. अक्षय गुलाब कोतकर (24, रा.गुरूवर्य नगर, तिरंगा पूलाजवळ, चाळीसगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

नाकाबंदीत गुटखा जप्त
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी बुधवारी रात्री नाकाबंदी केल्यानंतर तिरंगा पुलावर इको वाहन (क्रमांक एम.एच.19 ए.3958) ची तपासणी केल्यानंतर त्यात लहान-मोठ्या 18 गोण्या आढळल्या. गोण्यांची तपासणी केल्यानंतर त्यात गुटखा आढळला. पोलिसांनी पंचनामा करीत वाहन ताब्यात घेत चालक अक्षय कोतकर यास अटक केली.



यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहा.पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी, हवालदार पंढरीनाथ पवार, भूषण पाटील, भटू पाटील, मनोज चव्हाण आदींनी ही कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !