लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला : उद्या निवडणूक आयोगाची पत्रकार परीषद


Lok Sabha election bugle has sounded : Election Commission’s press conference tomorrow नवी दिल्ली : राज्यातील लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुका 2024 आणि राज्य विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी शनिवारी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.

उद्यापासून आचारसंहिता लागण्याचा अंदाज
शनिवारी दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाकडून निवडणुकांबाबत पत्रकार परीषद घेण्यात येत आहे. लोकसभेच्या निवडणुका सात ते आठ टप्प्यात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात दोन टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा निवडणूक आयोगाकडून उद्या 16 मार्च रोजी पत्रकार परिषदेत करण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकांसोबत ओडिशा, सिक्किम, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

2019 मध्ये भाजपाने मिळवले यश
2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीए आघाडी विरुद्ध इंडिया महाआघाडी अशी मुख्य लढत होणार आहे. या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि त्यांच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीने बहुमत मिळवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. भाजपने 290 जागा मिळवत एकहाती बहुमत मिळवले होते. तर एनडीएच्या एकूण 339 जागा निवडून आल्या. यामध्ये जेडीयू, शिवसेना यासारख्या पक्षांचा समावेश होता.

राजकीय पक्षांनी प्रचारात मुलांचा वापर करू नये
5 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना निवडणूक प्रचारात कोणत्याही स्वरूपात लहान मुलांचा वापर करू नये, असा सल्ला दिला आहे. सर्व पक्षांना पाठवलेल्या अ‍ॅडव्हायझरीमध्ये, निवडणूक पॅनेलने पक्ष आणि उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान पोस्टर आणि पॅम्प्लेट वाटणे आणि घोषणाबाजी करणे याला शून्य सहनशीलता व्यक्त केली आहे.


कॉपी करू नका.