झोपडीला पहाटे आग : 19 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू


Early morning hut fire : 19 goats tragically killed अमळनेर : पहाटेच्या सुमारास अचानक झोपडीला आग लागल्याने या घटनेत 19 शेळ्यांचा जळून मृत्यू झाला तर दोन शेळ्या गंभीर भाजल्या. अमळनेर तालुक्यातील झाडी येथे शुक्रवार, 15 रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

कुटूंब आले उघड्यावर
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवदास यादव भिल यांच्या मालकीच्या या शेळ्या होत्या. घराच्या मागील बाजूस असलेल्या झोपडीत बकर्‍या बांधलेल्या होत्या. पहाटे अडीच वाजेच्या सुमारास आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आरडाओरडा करून आजूबाजूच्या नागरिकांना बोलावले. अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना घटना कळवताच त्यांनी अग्निशमन बंब पाठवला. अग्निशमन दलप्रमुख दिनेश बिर्‍हाडे , फारुख शेख, आनंदा झिम्बल यांनी आग विझवली. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. तब्बल 19 शेळ्यांचा मृत्यू झाला. शेळ्यांवरच उदरनिर्वाह असल्याने शिवदास यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !