संबळपूर ते पुणे दरम्यान विशेष ट्रेन धावणार


भुसावळ : सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी संबळपूर ते पुणे दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.गाडी क्रमांक 08327 संबळपूर-पुणे विशेष गाडी 17 ते 31 मार्चदरम्यान प्रत्येक रविवारी संबळपूर येथून दहा वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी पुणे येथे 2.45 वाजता पोहचेल.

गाडी क्रमांक 08328 पुणे-संबळपूर विशेष गाडी 19 ते 2 एप्रिलदरम्यान प्रत्येक मंगळवारी पुणे येथून 09.15 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी संबळपूर येथे 1.30 वाजता पोहचेल. या गाडीला बारगढ रोड, बालनगीर, टिटलागढ़, कांताबाजी, खारियार रोड, महासुमुंड, लाखोली, रायपूर, दुर्ग, राज नांदगाव, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड कॉर्ड लाईन येथे थांबा देण्यात आला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !