लोकसभा निवडणुकांची घोषणा : देशात सात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका


Announcement of Lok Sabha Elections: Elections in seven phases in the country and in five phases in Maharashtra नवी दिल्ली : एप्रिल, मे, जून अशा तीन महिन्यात देशभरात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक होत असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. लोकसभा निवडणुकांची घाषणा शनिवारी दुपाारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली. 18 व्या लोकसभा निवडणुकांची घोषणा करत निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना चुनाव का पर्व, देश का गर्व या घोषवाक्यासह यंदा लोकशाहीचा उत्सव म्हणजे लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम पार पडत असल्याचे ते म्हणाले. देशात 7 टप्प्यात मतदान होणार आहे.

यासोबतच देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. 2024 हे वर्ष जगभरात निवडणुकांचं असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी केलं.

मतदानाची तारीख – 19 एप्रिल

पहिला टप्पा
मतदान- 26 एप्रिल

दुसरा टप्पा
मतदान- 7 मे

तिसरा टप्पा
मतदान- 13 मे

चौथा टप्पा
मतदान- 20 मे

पाचवा टप्पा
मतदान- 25 मे

सहावा टप्पा
मतदान- 1 जून

महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान
महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार असून 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे आणि 25 मे रोजी मतदान प्रक्रिया होईल तर देशातील संपूर्ण लोकसभेचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे.

देशात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी सर्वोतोपरी काळजी घेण्यात आली आहे. देशातील 97.8 कोटी मतदारांपैकी 49.7 कोटी पुरुष तर 47.1 कोटी महिला मतदानाचा हक्क बजावतील. तर, 48 हजार तृतीयपंथी मतदान करतील. त्यासाठी, 55 लाख ईव्हीएम मशिन मतदानासाठी सज्ज असल्याचंही कुमार यांनी सांगितलं.

हे आहेत आव्हान

मसल्स पॉवर, मनी पॉवर आणि मिस इन्फॉरमेशन या गोष्टींचं आपल्यापुढे आव्हान आहे. त्यावर, मात करण्यासाठीही निवडणूक आयोगाने यंत्रणा उभारली असल्याचं कुमार यांनी सांगितले. तसेच, हिंसामुक्त आणि गैरव्यवहारविरहीत निवडणुका राबवणं हे प्राधान्य असल्याचंही आयुक्तांनी स्पष्ट केलं.

सलग तिसर्‍यांदा निवडणूक जिंकून हॅट्ट्रिक करण्यासाठी भाजप रिंगणात उतरली आहे, तर विरोधी पक्ष एकजूट होऊन इंडिया आघाडीच्या माध्यमातून भाजपचा विजयी रथ रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत. गत, 2019 मध्ये भाजपने 303 जागा जिंकून इतिहास रचला होता. ‘अब की बार, 370 पार’चा नारा भाजपने दिला आहे. तर, एनडीएसह 400 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. विरोधकांनीही भाजपाचा विजयी रथ रोखण्यासाठी इंडिया आघाडीची वज्रमूठ बांधली आहे. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत मोठी रंगत पाहायला मिळणार आहे.


कॉपी करू नका.