शेअर मार्केटचा नादच खुळा : ज्येष्ठ महिलेला तब्बल पावणेतीन कोटींचा गंडा


The sound of the stock market is open : An elderly woman has a fortune of nearly three crores पुणे : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास जादा आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार नवीन नाहीत मात्र जादा पैशांच्या आमिषापोटी नागरीक त्याकडे वळतात व हातातील पैसे गमावून बसतात. असाच एक प्रकार पुण्यात घडला. ज्येष्ठ महिलेला अवघ्या दीड महिन्यात तब्बल दोन कोटी 84 लाख 59 हजारांचा गंडा घालण्यात आला.

असे आहे प्रकरण
15 जानेवारी ते 29 फेब्रुवारी 2024 यादरम्यानच्या काळात फिर्यादी महिलेला सायबर चोरट्याने फेसबुकवरून संपर्क साधला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवण्यात आले. महिलेने पैसे गुंतवण्यास होकार दिल्यानंतर त्यांना एक लिंक पाठवून व्हाटसअ‍ॅप ग्रुप जॉईन करायला सांगितले. महिलेने ग्रुप जॉईन केल्यावर ट्रेडिंग करण्यासाठी एक अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगितले. यात फिर्यादी यांनी अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांच्या अपवर शेअर ट्रेडिंग मधून फायदा झाल्याचे दिसून येत होते. मात्र तिवारी यांना ते पैसे काढता येत नव्हते.



यावेळी त्यांनी सायबर चोरट्याशी संपर्क केला तेव्हा वेळोवेळी सेबीची आणि मिळालेला नफा आणि पैसे मिळणार नाही अशी भीती दाखऊन आणखी पैसे भरायला सांगितले. मात्र पैसे मिळणार नाही याची खात्री झाल्यावर तक्रारदार महिलेने सायबर चोरट्या विरोधात फिर्याद दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !