भुसावळ बाजारपेठ पोलिसांची मोठी कामगिरी : चोरीच्या 12 दुचाकींसह त्रिकूट जाळ्यात
Big achievement of Bhusawal market police : Trio nabbed with 12 stolen bikes भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून चोरीच्या 12 दुचाकी जप्त केल्या. बाजारपेठ पोलिसांनी चार लाख 65 हजार रुपयांच्या दुचाकी जप्त केल्या असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
बाजारपेठ पोलिसात 25 जून 2023 रोजी दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल झाला होत व तपासादरम्यान संशयीत शेख बासीद शेख बाबु (28, रा.सुलतानपुरा, जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा, हल्ली मुक्काम मोहम्मदी नगर, भुसावळ), मोहम्मद अयाज मोहम्मद एजाज (25, रा.सुलतानपुरा, जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा) व रवींद्र अंबादास घोडसे (48, रा.पळसोडा, ता.संग्रामपूर, जि.बुलढाणा) यांना अटक केली. हवालदार विजय नेरकर यांनी विश्वासात घेवून संशयितांना विचारपूस केल्यानंतर चोरट्यांनी तब्बल 12 दुचाकी काढून दिल्या.


भुसावळातून 12 दुचाकींची चोरी
तिन्ही संशयीतांनी भुसावळ, जळगाव जामोद, जि.बुलढाणा, बर्हाणपुर (एम.पी) भागातून दुचाकींची चोरी केली असून त्यांच्याकडून चार लाख 65 हजारांच्या हिरो होंडा, हिरो, बजाज कंपनीच्या एकूण 12 दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई डीवायएसपी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंगेश जाधव, विजय नेरकर, यासीन पिंजारी आदींच्या पथकाने केली.