राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर पुन्हा टिका : म्हणाले…


मुंबई : केंद्र सरकारने माध्यमांना ताब्यात घेतले आहे. पण सत्य आणि हिंदुस्तान आपल्या सोबत आहे. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आमची यात्रा निघाली. भारत हा प्रेमाचा देश असताना द्वेष का पसरवला जात आहे. देशात अन्याय मोठ्या प्रमाणात होत असल्याने द्वेष वाढत चालला आहे. देशातील फक्त दोन-तीन टक्केच लोकांना न्याय मिळत आहे. सरकारी यंत्रणा त्यांच्यासाठी काम करत आहे. भाजप संविधानाला संपवू शकत नाही. त्यांच्यात तेवढी धमक नाही, अशी टिका राहुल गांधी यांनी केली.

आज शिवाजी पार्कवर राहुल गांधी यांची जाहीर सभा होत असून त्यापूर्वी आज सकाळी मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान ’न्याय संकल्प’ पदयात्रा देखील काढली.

व्यापार्‍यांना जीएसटीमधून दबाव टाकला जातोय
देशात पेपर फुटत आहेत. व्यापार्‍यांना जीएसटीमधून दबाव टाकला जात आहे. अनेक लोक त्यांच्यावर होणारा अन्याय मला भारत जोडो यात्रेत सांगत होते. यात्रेत फक्त मी एकटा चालत नव्हतो. लाखो लोकं चालत होते. ही लढाई राहुल गांधी आणि मोदी यांच्या विरोधात नाही. तर ही लढाई सेंट्रलाइज करण्याचा प्रयत्न सुरू असलेल्या लोकांविरोधात आहे”, असे राहुल यांनी म्हंटले आहे.


कॉपी करू नका.