मुक्ताईनगरात धाडसी घरफोडी : चार लाखांचा ऐवज लंपास


मुक्ताईनगर : घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी तब्बल सोन्याच्या दागिन्यांसह रोकड मिळून चार लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. 16 ते 17 फेब्रुवारीदरम्यान ही चोरी झाली. वरणगाव आयुध निर्माणीत पोस्ट मास्तर असलेले दिलीप बाविस्कर हे शहरातील प्रवर्तन चौकाजवळील श्री हॉटेलच्या मागील बाजुस राहतात. 16 रोजी ते कामानिमित्त जळगावात गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. कपाटातील 70 हजारांची रोकड, एक किलो चांदी आणि सोन्याचे दागिने असा तीन लाख 82 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. 18 रोजी रात्री 8.30 वााजता बाविस्कर दाम्पत्य घरी आल्यानंरी चोरी उघडकीस आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !