तुमचीही होवू शकते ऑनलाईन फसवणूक ? कुर्ती मागवताना अमळनेरच्या महिलेला एक लाखांचा गंडा
Can you be scammed online? A woman of Amalner was charged Rs 1 lakh while ordering a kurti अमळनेर : ऑनलाईन वस्तू मागवत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. अमळनेर शहरातील सराफ बाजार परिसरात राहणार्या 35 वर्षीय महिलेला बुकींग केलेले पार्सल घरी पोहोचण्याच्या नावाखाली सायबर भामट्यांनी एक लाखांचा गंडा घातला. या संदर्भात रविवार, 17 मार्च रोजी सायंकाळी सात वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे फसवणूक प्रकरण
योगीता राकेश भामरे (35, रा.सराफ बाजार, अमळनेर) ही महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांनी 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता मोबाईलच्या फेसबुक अकाऊंटवरून ऑनलाईन कपडे विक्री करणार्या एका अकाऊंटवरून लेडीज कुर्तीची ऑर्डर दिली. ही ऑर्डर 2 डिसेंबरपर्यंत घरापर्यंत येणार होती. दरम्यान दिलेल्या ऑर्डरचे पार्सल घरी न आल्याने त्यांनी गुगलवर कुरिअर ट्रॅकिंगची लिस्ट शोध घेत मोबाईल क्रमांक मिळविला. त्यावर कॉल करून विचारणा केली असता समोरील अज्ञात व्यक्तीने काही तांत्रिक कारणामुळे पार्सल अडकल्याचे सांगून दिलेल्या एका फाईलवर क्लिक करण्याचे सांगितले.


दरम्यान महिलेने फाईलवर क्लिक केल्यानंतर त्यांचे बँक खात्यातून पहिल्यावेळी 95 हजार रूपये आणि दुसर्या वेळेस 4 हजार 490 रुपये असे एकूण 99 हजार 490 रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने रविवार, 17 मार्च रोजी सायंकाळी सात वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे करीत आहे.