धुळे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : 17 लाखांचा मद्यसाठा जप्त ; चार आरोपींना अटक


Big operation of Dhule Crime Branch : Liquor stock worth 17 lakhs seized ; Four accused arrested धुळे : धुळे गुन्हे शाखेने अवैधरीत्या मद्याची वाहतूक करणारा ट्रक जप्त केला असून त्यातून 17 लाखांचा मद्यसाठा जप्त केला आहे. विशेष म्हणजे अवैधरीत्या दारू वाहतूक पकडली जावू नये यासाठी ट्रकमध्ये विशेष कप्पा बनवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

या आरोपींना अटक
प्रद्यन्म जितनारायण यादव (25, रा.गांधीनगर, कांदीवली पश्चिम, नुराणी मशिद जवळ, मुंबई), विरेंद्र कल्पनाथ मिश्रा (35, रा.कामनरोड, रजत अपार्टमेंट, पहिला मजला रूम नं. 301, गणेश मंदीराजवळ, वसई, जि.पालघर), आयशर चालक श्रीराम सुधाकर पारडे (32, रा.सुचकनाका, नेतेवली कल्याण, शिळरोड दुबे किराणा स्टोअर्स, मुकादम चाळ समोर, कल्याण), राकेश रामस्वरूप वर्मा (60, रा.सविना खेडा माताजी मंदीर जवळ, उदयपूर, जि.उदयपूर, राजस्थान) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.


कॉपी करू नका.