रेल कामगारांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन


यावल नाका ते झेडटीएस रस्त्याचे रेल्वेकडे व्हावे हस्तांतरण

भुसावळ : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनंतर रेल्वे यूनियनचच्या प्रतिनिधींनी सोमवारी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांची भेट घेवून भुसावल येथील यावल नाका ते झेडटीएस पर्यंतचा रस्ता पालिकेकडून रेल्वेकडे हस्तांतर करण्याबाबत लवकरात लवकर पत्र देण्यासंदर्भात चर्चा केली. जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, या रस्त्यासंदर्भात मंत्रालयात फाईल पाठवण्यात आली असून मंजुरी मिळाल्यानंतर रस्ता हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय,मुंबई यांच्याकडे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने यावल नाका, गांधी पुतळा ते झेडटीएस पर्यंतचा रस्ता हस्तांतरीत करून रेल्वेच्या ताब्यात देण्यात यावा याबाबतचे पत्र आल्यानंतर रेल्वेकडून तातडीने रस्त्याचे काम मार्गी लागेल, असा आशावादही व्यक्त करण्यात आला. सुमारे सात हजार कामगारांना या निर्णयानंतर मोठा दिलासा मिळणार आहे. निवेदन देताना ललितकुमार मुथा, प्रदीप भुसारे, प्रीतम टाक, राजकुमार गवळी यांनी निवेदन दिले. प्रसंगी ललित भारंबे, रूपसिंग पाटील, संजय चौधरी, विशाल सपकाळे, समाधान हिवाळे, महेश राणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !