भुसावळात भारतीय जनता पक्षाची कार्यकारिणी जाहीर


अध्यक्षपदी दिनेश नेमाडे तर सरचिटणीसपदी पवनकुमार बुंदेले

भुसावळ : भारतीय जनता पक्षाची भुसावळ शहर कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात शहराध्यक्ष दिनेश अरुण नेमाडे तर सरचिटणीसपदी पवनकुमार दौलत रामबुंदेले व अमोल महाजन यांची निवड करण्यात आली. अन्य कार्यकारीणीत उपाध्यक्षपदी प्रमोद प्रभाकर पाटील, अ‍ॅड.बोधराज दगडू चौधरी, किरण भागवत कोलते, दीपाली परीक्षीत बर्‍हाटे, प्रशांत विजय पाटील, वासंती चंद्रशेखर इंगळे असे सहा उपाध्यक्ष नेमण्यात आले तर राजु गणपत खरारे, स्नेहल सुहास अडावदकर, विनोद प्रकाश पचेरवाल, मेघा देवेंद्र वाणी, रेखा सुनील सोनवणे, सोनी संतोष बारसे असे सहा चिटणीस तर खजिनदारपदी नारायण रणधीर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे शहराध्यक्ष दिनेश नेमाडे यांनी कळवले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !