घटस्फोट वेदनादायी ; आयुष्यभर त्याचे परीणाम भोगावे लागतात : आरती चौधरी


Divorce is painful; One has to face the consequences throughout life : Aarti Chaudhary भुसावळ : पती-पत्नीच्या जीवनात घटस्फोट हा खूपच वेदनादायी असतो, भावनेच्या भरात काहीही निर्णय घेतले जातात पण ते निर्णय चुकतात आणि त्याचे परिणाम हे आयुष्यभर भोगावे लागतात. घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप होत असतो, असे प्रतिपादन नाशिकच्या हॅपी ह्यूमन फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या ऑनलाईन कार्यक्रमात आरती चौधरी यांनी केले.

घटस्फोटाचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात
हॅपी ह्यूमन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.प्रमोद महाजन यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मार्गदर्शन करतांना आरती चौधरी यांनी सांगितले की, घटस्फोट हा खूप वेदनादायक असतो व भावनेच्या भरात काही निर्णय घेतले जातात पण ते चुकतात आणि त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. त्यामुळे बहुतांश काय काय चुका घडतात व त्या कशा टाळाव्यात, घटस्फोट घेणार्‍या जोडप्याने मुलांचा शस्त्र’ म्हणून वापर करू नये, त्यामुळे मुलांची सुद्धा मानसिकता बिघडते, अशा अनेक विषयांशी संबंधित मार्गदर्शन त्यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ.प्रमोद महाजन, अरुण बोरोले, डॉ.अतुल पाटील (पुणे), डॉ. सुशांत पाटील, डॉ.वर्षा चौधरी यांच्यासह राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणचे मान्यवर या ऑनलाईन व्याख्यानात सहभागी झाले. या विषयाला धरून अनेक उपस्थितांनी प्रश्न विचारले. त्यांचेही निरसन करण्यात आले. लवकरच भुसावळमध्ये पर्सनॅलिटी टेस्ट सुरू करण्याचा मानस आरती चौधरी यांनी व्यक्त केला.


कॉपी करू नका.