निवडणूक निरीक्षक प्रियंका मीणा यांची भुसावळात भेट

ईव्हीएम गोदामाची केली पाहणी : बंदोबस्ताची केली पाहणी

0

Meeting of Election Inspector Priyanka Meena in Bhusawal भुसावळ : रावेर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेर लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्ती पोलीस निवडणूक निरीक्षक तथा आयपीएस अधिकारी प्रियंका मीणा यांनी येथे गुरुवारी शहराला भेट देत ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील उपस्थित होते. भुसावळ तहसील कार्यालयाच्या आवारातील गोदामात संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या आहेत. या मशीनच्या गोदामाला 24 तास पोलिसांचा खडा पहारा आहे. या भागात कुणालाही प्रवेश दिला जात नाही. गेल्या आठवड्यात सर्व मशीन्सचे सरमिसळ करण्यात आली यामुळे येत्या आठवड्यात हे मशीन प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वितरीत केले जाणार आहे.

बंदोबस्ताचा घेतला आढावा
गुरुवारी सकाळी 11 वाजता पोलीस निवडणूक निरीक्षक प्रियंका मीणा यांनी ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाला भेट देत पाहणी केली. येथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांशी चर्चा करून त्यांना बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर सूचना केल्यात. यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निता लबडे, शहरचे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे आदी उपस्थित होतेे.


कॉपी करू नका.