पुन्हा ट्रेडींगमध्ये फसवणूक : जळगावातील शिक्षकाला 34 लाखांचा गंडा

Cheating in re-trading : A teacher in Jalgaon was extorted 34 lakhs जळगाव : ट्रेडींगमध्ये सातत्याने लाखोंच्या फसवणुकीच्या घटना होत असतानाही मोहाला नागरिक बळी पडत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. जळगावातील शिक्षकाला आमिष दाखवत 34 लाखांमध्ये गंडवण्यात आले आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असे आहे फसवणूक प्रकरण
जळगावच्या फॉरैस्ट कॉलनीत शिक्षक अनिल पांडुरंग दांडगे (43) हे कुटूंबासह वास्तव्यास आहेत. 18 डिसेंबर 2023 ते आजपावेतो इंडिया वदवणे (11) या ग्रुपवरील डॉ.आर्यन रेड्डी (7738435709) व ट्रेडींग अॅडव्हटायझर निता मोदी (9226766025) वरून आलेल्या मेसेज धारकाने ट्रेडींग इन्व्हेस्टमेंट करण्याच्या बहाण्याने 34 लाख 16 हजार 111 रुपये इतकी रक्कम विश्वास संपादन करून मिळवली मात्र कुठलाही परतावा न दिल्याने फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर 4 रोज अनिल दांडगे यांनी जळगाव सायबर पोलिसात तक्रार नोंदवली. तपास प्रभारी निरीक्षक किसनराव नजन-पाटील करीत आहेत.