काँग्रेस म्हणजे कडू कारले : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला निशाणा

महाविकास आघाडी कमिशनबाज : मराठवाड्यासह विदर्भात सिंचन योजना ठप्प केल्याचा दावा

0

Congress is bitter: Prime Minister Narendra Modi hit the target चंद्रपूर :  काँग्रेस म्हणजे कडू कारले असून ते कधीच सुधरू शकत नाही, अशी घणाघाती टिका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील विदर्भातील महायुतीचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी दुपारी चंद्रपूरात सभा झाली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती.

मविआकडून तर स्वतःचा विकास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेच्या सुरूवातीलाच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, इंडिया आघाडीवाले राज्यात वेगवेगळ्या क्लृपत्या लढवून सत्तेत आले तेव्हा त्यांनी फक्त स्वत:चा विकास केला. स्वत:च्या कुटुंबाचा विकास केला. कुणाचा किती वाटा असेल, कुणाला कोणतं कंत्राट मिळेल, मलाईदार पोस्ट कुणाच्या खात्यात आणि किती येणार या हिशोबातच यांनी पूर्ण महाराष्ट्राचं भविष्य गुरफटून टाकलं होतं. महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित प्रोजेक्ट पाहिल्यावर हे म्हणायचे की, कमिशन आणा नाहीतर काम बंद करा. या लोकांनी जलयुक्त शिवार योजना बंद केली. बळीराजा जलसंजीवनी योजना बंद केली. विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनासाठी योजना होती ती योजनाही त्यांनी ठप्प केली होती, असे म्हणत मोदींनी जोरदार हल्लाबोल केला.

देशाचे विभाजन करणारे कोण ? काँग्रेसवर प्रश्नांची सरबत्ती
देशाचं विभाजन कुणी केलं? काश्मीरचा प्रश्न कुणी प्रलंबित ठेवला? आतंकवाद कुणामुळे निर्माण झाला? बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कारापासून वंचित कुणी ठेवलं?. आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रातच नाही तर देशभरात नक्षलवाद कमजोर पडला आहे. गडचिरोली आता पोलादाचं शहर म्हणून ओळखला जातं. कडू कारलं साखरात घोळा किंवा तुपात तळा, ते कडूच राहणार, अशी काँग्रेसची अवस्था आहे. ते कधीच सुधरू शकत नाही, अशी जोरदार टिका पंतप्रधानांनी केली.


कॉपी करू नका.