एरंडोल तालुक्यात वीज कोसळून युवक ठार

0

Youth killed by lightning in Erandol taluka एरंडोल  : जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात शुक्रवारी वादळी पावसाने तडाखा दिला. त्यातच एरंडोल तालुक्यातील नागदुली शिवारातील शेतात अचानक वीज कोसळल्याने 35 वर्षीय युवक ागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने तरुणाचे वडील थोडक्यात बचावले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. श्रीकांत उर्फ भैया भिका पाटील (35, रा.नागदुली, ता. एरंडोल) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

पावसोबतच कोसळली वीज
श्रीकांत उर्फ भैया भिका पाटील हा तरुण परिवारासह वास्तव्यास होता. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. त्यांचे नागदुली शिवारात शेत आहे. शुक्रवारी दुपारी वादळी वार्‍यासह पाऊस झाला. त्यावेळी श्रीकांत हा वडील भिका लक्ष्मण पाटील आणि काही मजुरांसोबत शेतातील चारा कुट्टी जमा करत होते. त्यावेळी श्रीकांत पाटील हा लाकूड घेण्यासाठी बाजूला जात असताना अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

यानंतर त्याच्या वडिलांनी आरडाओरड केली. शेजार्‍यांच्या मदतीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश पाटील यांनी त्याला तपासून मयत घोषित केले. दरम्यान, एकुलता एक मुलगा गेल्याने वडील व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. मयत युवकाच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुलगा, दोन मुली, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

 


कॉपी करू नका.