बनावट एलआयसी पॉलिसी देवून गंडवले : दिल्लीतील आरोपी जाळ्यात


जळगाव : एलआयसी कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून तक्रारदार विलास माधव पाठक (धुळे रोड, अमळनेर) यांची 7 फेब्रुवारी 2019 रोजी आरोपींनी बनावट एलआयीसी पाठवत तब्बल 12 लाख 70 हजार 255 रुपयात फसवणूक केली होती. पॉलिसींमध्ये गुंतवणूक केल्यानंतर चांगला परतावा देण्याचे आमिष आरोपींना देत तक्रारदाराचा विश्‍वास संपादन केला होता. या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तब्बल तीन दिवस पथकाने आरोपीचा दिल्ली तसेच गाझियाबादमध्ये शोध घेतल्यानंतर त्यास 23 रोजी अटक करण्यात यश आले. अमित सिंग उर्फ अमित देवेंद्र प्रकाश उर्फ मूलचंद शर्मा (बँक कॉलनी, हर्ष विहार, दिल्ली) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, आरोपीने गुन्ह्यातील रक्कम काढण्यासाठी वापरलेले वेगवेगळ्या बँकांचे सहा एटीएम कार्ड जप्त करण्यात आले.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बळीराम हिरे, उपनिरीक्षक अंगत नेमाणे, श्रीकांत चव्हाण, नितीन भालेराव, गौरव पाटील आदींच्या पथकाने आरोपीला 23 रोजी अटक केली. बुधवार, 26 रोजी त्यास जळगाव न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !