भुसावळातील कस्तुरी नगरात अति उच्च वीज दाबाने नागरिक त्रस्त

शिशिर जावळे यांची महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे तक्रार

0

In Kasturi Nagar in Bhusawal, citizens are suffering from very high voltage भुसावळ : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे भुसावळ शहर आणि परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. भुसावळ शहरातील प्रभाग 22 मधील कस्तुरी नगरात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सातत्याने अति उच्च दाबाने वीजपुरवठा होत असल्याने वीज उपकरणे अचानक बंद पडत व एलईडी बल्ब फुटत आहेत. हाय व्होल्टेजमुळे या प्रभागातील नगरातील नागरिक प्रचंड त्रस्त आहेत.

तक्रारीनंतर पोचपावतीला नकार
रात्रं-दिवस हाय व्होल्टेजमुळे नागरिकांना उकाड्यात घरात राहणे त्रासदायक झाले आहे. हाय व्होल्टेजमुळे नागरीकांकडील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जळण्याची, निकामी होण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत विद्युत वितरण कंपनीकडे रहिवाशांनी तक्रार केली मात्र त्या तक्रारीची पोच पावती सुद्धा तक्रारदारांना देण्यास संबंधित विद्युत वितरण कंपनीच्या ऑफिसमधील कर्मचार्‍यांनी टाळाटाळ केली व आम्ही पोचपावती देत नसतो, असे सांगून तिथून तक्रारदारांना तेथून निघून जाण्यास सांगितले. तक्रार केल्यानंतर देखील अद्यापपावेतो देखील कस्तुरी नगरातील विजेच्या अतिउच्च दाबाची समस्या ‘जैसे थे’ आहे.

प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी त्वरित याबाबत संबंधित कार्यकारी अभियंता यांना जाब विचारला. त्यांनी ही समस्या त्वरित सोडविण्याची आश्वासन दिली मात्र तरीदेखील ती समस्या सुटलेली नसल्याने जावळे यांनी थेट याबाबत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे तक्रार केली. तक्रारीची दखल न घेतल्यास याविरुद्ध आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते जावळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकांद्वारे कळविले आहे.


कॉपी करू नका.