जळगाव जिल्ह्यातील सहा संशयीत स्थानबद्ध

वाळू माफियांसह हातभट्टी विक्री करणार्‍यांचा समावेश : नशिराबाद हद्दीतील चौघांचा समावेश

0

Six suspects arrested in Jalgaon district जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाच वाळू माफियांसह एका हातभट्टी दारू विक्री करणार्‍या महिलेला स्थानबद्ध (एमपीडीए) करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता काढले आहे. यात 5 वाळू माफिया तर गावठी हातभट्टीची दारू विक्री करणार्‍या महिलेचा समावेश आहे.

यांच्याविरोधात झाली कारवाई
नशिराबाद हद्दीतील वाळू माफिया विशाल उर्फ विक्की उर्फ मांडवा नामदेव सपकाळे (28, रा.शंकरराव नगर), संदीप गणेश ठाकूर (30, रा.डीएनसी कॉलेज), विलास वामन कोळी (38, रा.जळगाव खुर्द, ता.जळगाव), शांताराम सुका बोरसे (45, रा.जळगाव खुर्द, ता.जळगाव) तर चोपडा हद्दीतील भैय्या मंगल पाटील (30, रा.चोपडा) यांच्यासह छायाबाई रमेश सकट (वय 58, रा. राजीव गांधी नगर, जळगाव) या हातभट्टी दारू विक्री करणार्‍या महिलेविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यांना वर्षभरासाठी राज्यातील विविध कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते , अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, चोपडा पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, भुसावळ पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील, एएसआय युनूस शेख इब्राहीम, सुनील दामोदरे, जयंत चौधरी, रफिक शेख कालू, ईश्वर पाटील आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.