भुसावळातील पहेलवान आशिक बागवान यांचा कुस्त्यांच्या सामन्यात हृदयविकाराने मृत्यू
भुसावळ : कुस्त्यांचा आखाडा गाजवणार्या आशिक बागवान यांच्यासाठी त्यांनीच आयोजित केलेली दंगल अखेरची ठरली. कुस्त्यांचे सामने रंगात आले असतानाच बागवान यांना हृदविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. ही घटना बुधवारी सायंकाळी ही घटना खडका रोडवरील नवीन ईदगाह मैदानावर ‘खान्देश का महामुकाबला’ या कुस्त्यांच्या दंगलीत घडल्ी.
हृदयविकाराने झाला मृत्यू
शहरातील इक्बाल पहिलवान आखाड्यातर्फे बुधवारी खान्देश का महामुकाबला या कुस्त्यांचे सामने आयोजित करण्यात आले असता या सामन्यांसाठी राज्यासह देशभरातून नामांकित मल्ल आले होते. मुख्य आयोजक नगरसेवक इक्बाल सरदार बागवान यांचे लहान बंधू तथा केळीचे व्यापारी व आयोजक आशिक सरदार बागवान हे कुस्त्यांच्या आखाड्यातच नियोजन पाहत होते. मुख्य चार कुस्त्यांच्या लढतीमधील चौथ्या क्रमांकाची लढत सुरू झाल्यानंतर त्यांना आखाड्यात अस्वस्थ वाटू लागले. भोवळ येत असल्याने ते आखाड्याबाहेर येवून जमिनीवर बसले. आयोजकासह बागवान परिवारातील सदस्य व मित्रमंडळींनी त्यांना तत्काळ खडकारोडवरुन डॉ. मानवतकर रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉ.राजेश मानवतकर यांनी ईसीजी, प्रथमोचार केले मात्र तीव्र हदयविकारामुळे त्यांचा मृत्यू झाला. मात्र यानंतर पुन्हा प्रयत्न म्हणून बागवान परीरवारासह सचिन चौधरी, नगरसेवक दुर्गेश ठाकूर, रमेश चौधरी, युवा अंबोले आदींनी त्यांना उपचारार्थ गोदावरी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच गोदावरी रुग्णालयात त्यांना मृत घोषित केले. मृत आशिक बागवान यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, चार भाऊ, तीन बहिणी, वडील असा परीवार आहे.



