मित्राच्या लग्नाहून परतताना अपघात : पारोळा तालुक्यात टँकरने चिरडताच माय-लेक ठार

0

Accident while returning from a friend’s wedding : My-Lake was killed when he was crushed by a tanker in Parola taluka पारोळा : भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातानंतर रस्त्यावर पडलेल्या माय-लेकाला टँकरने चिरडल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील सारवे, बाभळे नाग फाट्याजवळ मंगळवार, 23 रोजी दुपारी तीन वाजता घडली. या अपघातात पूनम प्रतीक पाटील (24) व एक वर्षाचा चिमुकला अगस्त्य सुनील पाटील या दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मामाच्या भेटीसाठी निघाल्यानंतर गाठले मृत्यूने
नंदुरबार जिल्ह्यातील कुकावल येथील गुरांचे डॉक्टर असलेले प्रतीक सुनील पाटील हे पत्नी पुनम व एक वर्षाचा चिमुकला अगस्त्य यांना घेवून पारोळा तालुक्यातील चिखलोड येथे (एम.एच. 39 ए.एच.0407) क्रमांकाच्या दुचाकीने मित्राच्या लग्नासाठी आले होते. लग्नकार्य आटोपून हे दाम्पत्य एरंडोल येथे मामांच्या भेटीसाठी जात होते. मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील पारोळा तालुक्यातील सारवे बाभळे नाग फाट्या जवळ उन्हामुळे डांबर निघून खडी वरती आल्याने त्यांची दुचाकी घसरली. यामध्ये दुचाकीस्वार असलेले दाम्पत्य हे रस्त्यावर कोसळले. याचेवळी मागून भरधाव वेगाने येणारे टँकर (एम.एच.40 सी.टी. 4097) ने पूनम व त्यांच्या एक वर्षाच्या चिमुकल्याला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, दुचाकीस्वार डॉ. प्रतीक हे रस्त्याच्या कडेला पडल्यामुळे ते जखमी झाले.

अपघातानंतर पोलिसांची धाव
अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी अभिजीत पाटील, नरेंद्र पाटील, दीपक अहिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींसह मृतांना तात्काळ पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले.


कॉपी करू नका.