श्रीराम पाटील यांच्या विजयासाठी अनवाणी प्रचार : कुर्‍हाकाकोड्यातील तरुणाच्या संकल्पाचे सर्वत्र कौतूक

महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन

0

मुक्ताईनगर : एखाद्यात व्यक्तीवर असलेल्या निष्ठा, प्रेमापोटी निष्ठावानांकडून अनेकदा वेगवेगळे संकल्प, उपक्रम राबविले जातात. लोकसभेच्या निवडणुकीत रावेर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या श्रीराम पाटील यांच्या विजयासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हाकाकोडा येथील श्रीराम हरिभाऊ इंगळे या युवकाने पाटील यांच्या विजयासाठी 4 जूनपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाची रावेर मतदार संघात एकच चर्चा सध्या सुरू आहे.

अनवाणी फिरून प्रचार
रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांच्या विजयासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हाकाकोडा येथील श्रीराम हरिभाऊ इंगळे या युवकाने हा संकल्प केला आहे. श्रीराम पाटील निवडून येतील तोपर्यंत म्हणजे 4 जूनपर्यंत पायात चप्पल घालणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या विजयासाठी आपल्या कुर्‍हा काकोडा गावासह मुक्ताईनगर मतदार संघात श्रीराम इंगळे हे प्रचार करत असून श्रीराम पाटील यांनाच विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत.

सोमवारी श्रीराम इंगळे यांनी उमेदवार श्रीराम पाटील यांची घोडसगाव येथे भेट घेतली व त्यांना विजयी करण्याचा निर्धार बोलून दाखवला. श्रीराम इंगळे हे सध्या भर उन्हाळ्यातही अनवाणी म्हणजे पायात चप्पल न घालता प्रचार करीत आहेत. त्यांचा हा संकल्प श्रीराम पाटील यांच्यावर असलेली निष्ठा व प्रेम दर्शवत असून रणरणत्या उन्हातही त्यांनी दाखवलेल्या धाडसासह निष्ठेचे कार्यकर्त्यांमधून कौतूक होत आहे.

 


कॉपी करू नका.