भुसावळात उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा

0

भुसावळ : भाजपाच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ मंगळवार, 7 मे रोजी सायंकाळी सहा वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भुसावळ शहरातील श्री मातृभूमी चौकात जाहीर सभा होत आहे. या जाहीर सभेकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री शहरात येत असल्याने सभेची जय्यत तयारी केली जात आहे.

जिल्ह्यातील नेत्यांची उपस्थिती
रावेर लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या उमेदवार व खासदार रक्षाताई खडसे यांनी प्रचारात आघात घेतली आहे. खासदाराच्या प्रचारार्थ भुसावळ शहरातील श्री मातृभूमी चौकात मंगळवार, 7 रोजी रोजी सायंकाळी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांची उपस्थिती लाभणार आहे. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचे नियोजन केले जात असून कार्यकर्ते झटून कामाला लागले आहेत.

या सभेला मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर महायुतीचे नेते व पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे.


कॉपी करू नका.