रणरणत्या उन्हातही वंचित आघाडीच्या रणरागिणी मतदारांच्या दारी

उच्चशिक्षीत उमेदवार संजय ब्राह्मणे यांना निवडून देण्याचे आवाहन

0

भुसावळ : रावेर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय पंडित ब्राह्मणे यांनी महाविकास आघाडी व भाजपा उमेदवारापुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे. मतदारसंघातील प्रत्येक गाव-खेड्यांवर कार्यकर्ते व उमेदवार पोहोचून वंचितचा प्रचार करीत आहेत. यंदा लोकसभेत परिवर्तन अटळ असून संजय ब्राह्मणेच विजयी होतील, असा विश्वास कार्यकर्ते प्रचारादरम्यान बोलून दाखवत आहेत.

गावा-गावात प्रचार
वंचितच्या महिला कार्यकर्त्यांकडून भुसावळ तालुक्यातील हतनूर, टहाकळी, पवन नगर ऑर्डनन्स फॅक्टरी परिसर या ठिकाणी रणरणत्या उन्हात देखील घरोघरी जाऊन उत्स्फूर्तपणे संजय ब्राह्मणे यांचा प्रचार करण्यात आला. रावेर लोकसभेच्या विकासासाठी वंचित आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.


कॉपी करू नका.