खासदार रक्षाताई खडसेंच्या विजयासाठी मंत्री गिरीश महाजन मैदानात : जामनेर तालुक्यात प्रचार दौरा

0

जामनेर : रावेर लोकसभा निवडणुकीतील महायुती व भाजपाच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांच्या विजयासाठी मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील ताकद लावली आहे. मंगळवारी जामनेर तालुक्यातील मौजे वाडीकिल्ला, वाघारी, बेटावद बु., बेटावद खु., रांजणी, कापुसवाडी, पळासखेडा काकर, देऊळगाव, तोरनाळा, पिंपळगाव आदी गावात झालेल्या प्रचार दौरा करण्यात आला. यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांना बहुसंख्य मताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

तिसर्‍यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदानाचे आवाहन
सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये रावेर लोकसभा क्षेत्र भाजपा व महायुती अधिकृत उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी जामनेर तालुक्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, मनसे ई. मित्र पक्षाच्या पदाधिकारी यांच्यासह जामनेर तालुक्यातील मौजे वाडीकिल्ला, वाघारी, बेटावद बु., बेटावद खु., रांजणी, कापुसवाडी, पळासखेडा काकर, देऊळगाव, तोरनाळा, पिंपळगाव ई. गावात प्रचारार्थ भेट देऊन, मतदारांशी संवाद साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसर्‍यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी जास्तीतजास्त संख्येने भाजपाला मतदान करण्याचे यावेळी आवाहन केले.


कॉपी करू नका.